2025 Kawasaki Z900 भारतात लॉन्च; किंमत ₹9.52 लाख, नव्या वैशिष्ट्यांसह स्टाईल अपडेट

2 Min Read
Kawasaki Z900 2025 Launched India Price Features

Kawasaki Z900 2025 Launched India Price Features : Kawasaki ने आपल्या लोकप्रिय Z900 नेकेड बाईकचे 2025 अपडेटेड वर्जन भारतात लॉन्च केले असून, त्याची एक्स-शोरूम किंमत ₹9.52 लाख ठेवण्यात आली आहे. नव्या मॉडेलमध्ये स्टाईलिंगपासून ते इलेक्ट्रॉनिक्सपर्यंत अनेक महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत, तसेच युरो 5+ मानकांचे पालन देखील यामध्ये करण्यात आले आहे.

948cc क्षमतेचा चार-सिलेंडर लिक्विड-कूल्ड इंजिन आणि मूळ फ्रेम यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नसला तरी, या बाईकमधील राईडिंग अनुभव अधिक प्रगत बनवण्यासाठी तांत्रिक सुधारणांचा समावेश करण्यात आला आहे. नव्या मॉडेलमध्ये राईड-बाय-वाईर थ्रॉटल तंत्रज्ञान दिल असून त्यामुळे क्रूझ कंट्रोल आणि बायडायरेक्शनल क्विकशिफ्टर यासारखी फीचर्स मिळतात.

2025 Kawasaki Z900 ला आता नवीन 5-इंच TFT डॅशबोर्ड मिळतो जो ब्लूटूथ-सपोर्टेड आहे. याचबरोबर स्विचगियर हे Ninja 1100SX या स्पोर्ट्स बाईकमधून घेतले आहे. बाईकमध्ये 5-अ‍ॅक्सिस IMU सेन्सरचा वापर करण्यात आला असून, तो पॉवर मोड्स, ट्रॅक्शन कंट्रोल, राइडिंग मोड्स आणि ड्युअल चॅनल ABS यासारख्या इलेक्ट्रॉनिक सहाय्य प्रणालींसह समन्वय साधतो.

नवीन मॉडेलमध्ये पुढील बाजूस 300mm ड्युअल डिस्क ब्रेक आणि रॅडियली माउंटेड 4-पिस्टन Nissin कॅलिपर्स दिले गेले आहेत, जे मागील अ‍ॅक्सिअल कॅलिपर्सपेक्षा अधिक कार्यक्षम आहेत. टायर्समध्येही सुधारणा करत, आधीच्या Roadsport 2 ऐवजी Dunlop Sportmax Q5A टायर्स देण्यात आले आहेत. टायर साइज मात्र पूर्वीसारखाच ठेवण्यात आला आहे.

Z900 चे लुक्स अधिक अ‍ॅग्रेसिव्ह झाले असून, हेडलाइट डिझाईन Z500 प्रमाणे आहे. बसण्याच्या जागेतील कशन वाढवण्यात आले आहे, मात्र सीट हाइटमध्ये कोणताही बदल न करता राइडरची पोझिशन टिकवण्यात आली आहे.

भारतात ही बाईक दोन रंगांमध्ये उपलब्ध आहे — ब्लॅक/ग्रीन आणि ब्लॅक/रेड. किंमतीच्या बाबतीत Z900 ही Honda CB650R (₹9.20 लाख ते ₹9.60 लाख), Triumph Street Triple R (₹10.17 लाख ते ₹10.43 लाख) आणि Ducati Monster (₹12.95 लाख) यांच्याशी थेट स्पर्धा करते.

हेही वाचा : Honda CD 110 Dream बंद; ११ वर्षांच्या प्रवासानंतर बजेट बाईकने केला अलविदा.

Share This Article