Honda CD 110 Dream Discontinued : बजेट सेगमेंटमधील लोकप्रिय बाईक Honda CD 110 Dream अखेर बंद करण्यात आली आहे. Honda Motorcycle and Scooter India (HMSI) ने ही अधिकृत घोषणा केली असून, ही कंपनीच्या सर्वात स्वस्त आणि एंट्री-लेव्हल कम्युटर बाईकपैकी एक होती. तब्बल ११ वर्षांनंतर या बाईकचा प्रवास संपुष्टात आला असून, यामागे विक्रीतील मोठी घसरण कारणीभूत ठरली आहे.
विक्री घटल्याने CD 110 Dream बंद
CD 110 Dream बाईकला एके काळी मोठी मागणी होती, मात्र अलीकडच्या काळात ग्राहकांची पसंती बदलल्याने CD 110 Dream ची विक्री सातत्याने घसरत होती. ऑक्टोबर २०२४ मध्ये जिथे या गाडीचे ८,५११ युनिट्स विकले गेले, तिथे मार्च २०२५ मध्ये ही संख्या अवघ्या ३३ युनिट्सवर आली. अशा परिस्थितीत HMSI ने हे मॉडेल बंद करण्याचा निर्णय घेतला.
बाईकचे इंजिन आणि फीचर्स कसे होते?
CD 110 Dream मध्ये १०९.५१ सीसीचे एअर-कूल्ड इंजिन देण्यात आल होत, जे ८.६ bhp पॉवर आणि ९.३ Nm टॉर्क निर्माण करायच. यात 4-स्पीड गिअरबॉक्स, OBD2 एमिशन नॉर्म्स आणि E20 इंधनासाठी सुसंगत इंजिन होत. या बाईकमध्ये Combi-Brake System (CBS), 5-स्पोक अलॉय व्हील्स, टेलिस्कोपिक फ्रंट फोर्क, ट्विन शॉक रिअर सस्पेंशन, आणि मेंटेनन्स फ्री बॅटरी यांसारखी वैशिष्ट्ये होती.
Shine 100 ची वाढती लोकप्रियता
CD 110 Dream बंद होण्यामागे होंडाचीच दुसरी बाईक Shine 100 हे एक महत्त्वाचे कारण ठरली आहे. ही बाईक CD 110 पेक्षा सुमारे १०,००० रुपयांनी स्वस्त असल्याने ग्राहकांनी कमी किंमतीला मिळणारी Shine 100 पसंत केली.
Shine 100 मध्ये ९८.९८ सीसीचे इंजिन, ५.३ bhp पॉवर आणि ८.०५ Nm टॉर्क, १७-इंच अलॉय व्हील्स आणि ड्रम ब्रेक्स मिळतात. याची एक्स-शोरूम किंमत सुमारे ₹६२,००० आहे.
Honda ची एंट्री-लेव्हल बाईक आता इतिहासात
CD 110 Dream ने एक दशकाहून अधिक काळ लाखो भारतीयांची साथ दिली, विशेषतः ज्यांना बजेटमध्ये विश्वसनीय बाईक हवी होती. मात्र बदलत्या बाजारपेठेतील स्पर्धा आणि ग्राहकांच्या पसंतीने या बाईकचे वर्चस्व संपवले. आता Shine 100 ही होंडाच्या बजेट सेगमेंटमधील एक नवीन ओळख बनली आहे.
हेही वाचा : नवीन स्टाइल आणि स्मार्ट फीचर्ससह TVS Jupiter 125 DT SXC भारतात लॉन्च; जाणून घ्या काय आहे खास.