Honda Activa 6g Scooter 2025 Review : देशात सर्वाधिक विक्री होणाऱ्या स्कूटर्समध्ये अग्रस्थानी असलेली Honda Activa आता 6G मॉडेलसह आणखी मजबूत, किफायतशीर आणि आधुनिक बनली आहे. सद्यस्थितीत पेट्रोल दर वाढलेले असतानाच, जास्त मायलेज देणारी ही स्कूटर सामान्य ग्राहकांसाठी फायदेशीर पर्याय ठरत आहे.
किफायतशीर किंमत
Activa 6G ची सुरुवातीची किंमत ₹76,000 (एक्स-शोरूम) असून, ती उच्च व्हेरिएंटसाठी ₹82,000 पर्यंत जाते. कामावर जाणारे कर्मचारी, महाविद्यालयीन विद्यार्थी आणि घरगुती वापरासाठी एक विश्वासार्ह वाहन शोधणाऱ्यांसाठी Honda Activa 6G योग्य पर्याय ठरते.
मायलेज आणि कार्यक्षमतेच संतुलन
Honda चा दावा आहे की Activa 6G तब्बल ६५ किमी/लीटर इतक मायलेज देते. दररोजच्या शहरातील प्रवासासाठी हा मोठा फायदा ठरतो, कारण यामुळे इंधन खर्च कमी होतो आणि वारंवार पेट्रोल भरण्याची गरजही लागत नाही.
इंजिन आणि तांत्रिक वैशिष्ट्य
110cc BS6 इंजिन – पर्यावरणपूरक आणि कमी प्रदूषण
Silent Start System – स्कूटर सुरू होताना कोणताही आवाज नाही
3-स्टेप अॅडजस्टेबल सस्पेन्शन – कसल्याही रस्त्यांवरही आरामदायक राइड
वैशिष्ट्यपूर्ण सुविधा
LED हेडलाइट्स – रात्रीच्या प्रवासासाठी सुरक्षेची हमी
डिजिटल-एनालॉग मीटर – स्पीड आणि फ्युएल माहिती एका नजरेत
बाहेरील फ्युएल लिड – सीट न उघडता पेट्रोल भरण्याची सोय
Activa 6G कोणासाठी आहे?
ही स्कूटर अशा वापरकर्त्यांसाठी योग्य आहे:
ज्यांना कमी देखभालीच वाहन हव आहे
ज्यांना पेट्रोल वाचवायच आहे
जे विश्वासार्हता आणि आराम एकत्रित शोधत आहेत
सर्व वयोगटांसाठी योग्य असलेल वाहन हव आहे
काही गोष्टींचा अभाव
Activa 6G मध्ये फ्रंट डिस्क ब्रेक आणि फुल डिजिटल डिस्प्ले नसल्याच लक्षात येत. मात्र, इतर वैशिष्ट्य आणि Honda ब्रँडचा दर्जा पाहता, ही उणीव दुर्लक्ष करण्यासारखी आहे.
Honda Activa 6G ही शहरातील दररोजच्या वापरासाठी योग्य स्कूटर आहे. मायलेज, किंमत, टिकाव आणि आरामदायक राइड या सर्व गोष्टींचा समतोल राखणारी ही स्कूटर २०२५ मधील सर्वोत्कृष्ट किफायतशीर पर्यायांपैकी एक आहे.
हेही वाचा : Suzuki E Access: स्मार्ट लुक, दमदार परफॉर्मन्स आणि परवडणारी किंमत असलेली नवीन इलेक्ट्रिक स्कूटर.