Bike Mileage Increase : दररोज बाईकने ऑफिस, मार्केट किंवा इतर कामासाठी प्रवास करणाऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. तुम्ही जर सतत पेट्रोलच्या वाढत्या खर्चाने त्रस्त असाल, तर तुमच्या बाईकचे मायलेज सुधारण्यासाठी फार मोठ काही करण्याची गरज नाही. फक्त दर आठवड्याला ही एक सवय अंगीकारा, आणि तुमच्या गाडीच मायलेज नक्कीच वाढेल.
इंजिन नव्हे, तर टायरही कारणीभूत!
अनेकदा लोक समजतात की बाईकच मायलेज कमी होण्याच मुख्य कारण म्हणजे इंजिन. पण तज्ज्ञ सांगतात की बाईकच्या टायरमधील चुकीचा हवा दाब (एअर प्रेशर) देखील मायलेज कमी होण्यामागच मोठ कारण असतो. जर टायरमध्ये पुरेशी हवा नसेल, तर बाईक चालवताना इंजिनवर अधिक ताण येतो, त्यामुळे इंधन जास्त जळत.
हे लक्षात ठेवा – एअर प्रेशर ठेवा योग्य पातळीवर
बाईकच्या टायरमध्ये कंपनीने दिलेल्या मापदंडानुसार हवा भरलेली असेल, तर बाईकच मायलेज अधिक चांगल मिळत. याशिवाय राइडही स्मूद होते, ब्रेकिंगवर चांगला कंट्रोल राहतो आणि टायर लवकर झिजत नाहीत.
प्रत्येक आठवड्याला हे काम करा:
बाईकच्या टायरच एअर प्रेशर तपासा.
टायर फ्लॅट वाटेपर्यंत थांबू नका; नियमितपणे हवा तपासून भरून घ्या.
वेळोवेळी टायरमध्ये हवा कमी होते, त्यामुळे वेळच्यावेळी तपासणी आवश्यक आहे.
काय होतील फायदे?
मायलेजमध्ये वाढ होईल.
इंजिनवरील लोड कमी होईल.
ब्रेकिंग कंट्रोल चांगला राहील.
टायरच आयुष्य वाढेल, म्हणजेच खर्च कमी होईल.
प्रवास अधिक स्मूद आणि सुरक्षित होईल.
हेही वाचा : Honda Activa 7G येतेय धमाकेदार फीचर्ससह, 66kmpl मायलेज आणि फक्त ₹3999 EMI मध्ये.