TVS Jupiter CNG Scooter Launch June 2025 : TVS Motor Company लवकरच जगातील पहिली CNG स्कूटर – TVS Jupiter CNG भारतात लाँच करणार आहे. Bharat Mobility Global Expo 2025 मध्ये याचे प्रदर्शन झाल्यानंतर ग्राहका या स्कूटरची उत्सुकतेने वाट पाहत आहेत. आता मिळालेल्या माहितीनुसार, ही CNG स्कूटर याच महिन्यात म्हणजे जून 2025 मध्ये लाँच होण्याची शक्यता आहे.
TVS Jupiter CNG मध्ये काय खास आहे?
ही स्कूटर CNG + पेट्रोल ड्युअल फ्युएल पर्यायात येणार असून, यामध्ये एक 1.4 किलो CNG टाकी आणि 2 लिटर पेट्रोल टाकी असेल. या दोन्ही इंधनावर मिळून एकूण 226 किमीची रेंज TVS ने जाहीर केली आहे. ही स्कूटर 124.8cc इंजिन वापरते, जे 7.1 bhp पॉवर आणि 9.4 Nm टॉर्क निर्माण करते.
TVS Jupiter CNG किमतीचा अंदाज
TVS Jupiter CNG ची किंमत ₹90,000 ते ₹1.15 लाख (ऑन-रोड, मुंबई) दरम्यान असण्याची शक्यता आहे. ही किंमत इंधन बचतीच्या दृष्टीने आकर्षक मानली जात आहे, खासकरून ज्यांना दररोज लांबचा प्रवास करावा लागतो.
डिझाइन आणि वैशिष्ट्ये
TVS Jupiter CNG चे डिझाइन हे Jupiter 125 पेट्रोल व्हेरियंटप्रमाणेच असेल.
फिचर्स, एर्गोनॉमिक्स, आणि ब्रेकिंग सिस्टमही पेट्रोल व्हेरियंटसारखीच असेल.
मात्र, CNG टाकीमुळे अंडरसीट स्टोरेज स्पेस कमी असेल.
हेही वाचा : Tata EV कार्सवर जूनमध्ये ₹1 लाखांपर्यंत सवलत, Tiago, Nexon, Punch व Curvv EV वर खास ऑफर्स.