Honda Shine 100: फुल टँकमध्ये 700KM धावणारी बाइक, फक्त 67 हजारात; बजेट राइडर्ससाठी परफेक्ट पर्याय

2 Min Read
Honda Shine 100 Bike Mileage Sales 2025

Honda Shine 100 Bike Mileage Sales 2025 : भारतीय बाजारात सर्वात स्वस्त मानली जाणारी Honda Shine 100 बाइक सध्या ग्राहकांच्या पसंतीला उतरली आहे. अवघ्या ₹67,000 एक्स-शोरूम किंमतीत उपलब्ध असलेल्या या बाइकने एका महिन्यात तब्बल 1.69 लाख युनिट्सची विक्री केली आहे, जी मागील वर्षाच्या तुलनेत 18% वाढ दर्शवते. या बाइकचा उल्लेख केवळ स्वस्तातल्या बाइकपुरताच मर्यादित नसून, तिच्या अफलातून मायलेजमुळे ती देशभरात लोकप्रिय ठरते आहे.

सॉलिड फिचर्स आणि जबरदस्त मायलेज

नवीन Honda Shine मध्ये फुली डिजिटल डॅश, रिअल-टाईम मायलेज इंडिकेटर, डिस्टन्स टू एम्प्टी डिस्प्ले, आणि USB टाईप-C पोर्ट सारखी अत्याधुनिक फीचर्स देण्यात आली आहेत. त्यामुळे प्रवास करताना मोबाईल चार्ज करणेही शक्य होते.

Honda Shine 100 मध्ये 10 लिटरचा फ्युएल टँक असून, योग्य राइडिंग कंडिशन्समध्ये ही बाइक एकाच टँकफुल मध्ये 700 किमी पर्यंतचे अंतर सहज कापू शकते. तर Shine 125 चा ARAI सर्टिफाईड मायलेज आहे 55 kmpl, ज्यात 10.5 लिटर टँकसह अंदाजे 575 किमीचा प्रवास करता येतो.

इंजिन आणि परफॉर्मन्स

या बाइकमध्ये अपडेटेड OBD-2B नॉर्म्स सह 4-स्ट्रोक, SI, BS-VI इंजिन देण्यात आले आहे. यामुळे ती 7.9 kW पॉवर आणि 11 Nm टॉर्क निर्माण करते. इंजिनचे हे अपडेट असूनही, तिचा परफॉर्मन्स कायम आहे, हे विशेष.

बजेट राइडर्ससाठी परफेक्ट पर्याय


कमी बजेटमध्ये चांगले मायलेज देणारी बाइक हवी असेल, तर Honda Shine 100 ही एक उत्तम पर्याय आहे. तिच्या दमदार फीचर्स, मायलेज, आणि जबरदस्त विक्री यामुळे ती 2025 मध्येही सर्वोत्तम बाइक बनू शकते.

हेही वाचा : Hero Xtreme 125R लाँच; दमदार इंजिन, प्रीमियम लुक आणि 55kmpl मायलेजसह जबरदस्त कमबॅक.

Share This Article