Hero Xtreme 125r Launch : Hero MotoCorp ने त्यांच्या बाईकप्रेमींसाठी Hero Xtreme 125R ही नवी दमदार आणि आकर्षक बाईक भारतीय बाजारात लाँच केली आहे. परफॉर्मन्स, स्टाईल आणि मायलेज हवी असलेल्या राइडर्ससाठी ही बाईक एक चांगला पर्याय ठरते आहे.
Hero Xtreme 125r दमदार इंजिन आणि परफॉर्मन्स
Hero Xtreme 125R मध्ये 125cc चा एअर-कूल्ड सिंगल सिलेंडर इंजिन देण्यात आला आहे, जो 11.55 PS पॉवर जनरेट करतो. या बाईकच टॉर्क रिस्पॉन्स अतिशय चांगल असून ही बाईक केवळ 5.9 सेकंदात 0 ते 60 किमी/ताशी वेग पकडते. यामुळे शहरी तसेच मोकळ्या रस्त्यांवरसुद्धा ती सहज चालवता येते.
फिचर्स आणि टेक्नोलॉजी
Xtreme 125R मध्ये फुल LED लाइटिंग, प्रोजेक्टर हेडलाइट, डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल आणि i3S आयडलिंग स्टॉप सिस्टम देण्यात आले आहे. राईडिंग अनुभव सुधारण्यासाठी फ्रंटला टेलीस्कोपिक फोर्क आणि रियरला शोवा मोनोशॉक सस्पेंशन देण्यात आले आहे.
डिझाइन आणि मायलेज
ही बाईक स्पोर्टी आणि मस्क्युलर लुक मध्ये येते. अॅग्रेसिव्ह स्टाईलिंग, स्प्लिट सीट आणि एरोडायनामिक फॉर्ममुळे ती युथसाठी परफेक्ट चॉईस बनते. मायलेजच्या बाबतीत ही बाईक 55kmpl पर्यंतचा दमदार रिझल्ट देते, जो फ्युएल इकॉनॉमीसाठी महत्त्वाचा ठरतो.
Hero Xtreme 125R किंमत
Hero Xtreme 125R दोन व्हेरिएंटमध्ये (IBS आणि ABS) उपलब्ध असून तिची एक्स-शोरूम किंमत ₹95,000 ते ₹99,500 च्या दरम्यान आहे.
हेही वाचा : Honda CD 110 Dream बंद; ११ वर्षांच्या प्रवासानंतर बजेट बाईकने केला अलविदा.