नवीन स्टाइल आणि स्मार्ट फीचर्ससह TVS Jupiter 125 DT SXC भारतात लॉन्च; जाणून घ्या काय आहे खास

2 Min Read
Tvs Jupiter 125 Dt Sxc Launch Price Features Marathi

नवीन स्टाइल आणि स्मार्ट फीचर्ससह TVS Jupiter 125 DT SXC भारतात लॉन्च; जाणून घ्या काय आहे खास

TVS Motor Company ने आपल्या लोकप्रिय Jupiter 125 स्कूटरच्या नव्या DT SXC वेरिएंटची भारतात घोषणा केली आहे. या वर्जनची एक्स-शोरूम किंमत अंदाजे 89,000 रुपये ठेवण्यात आली असून, यात काही महत्त्वाचे स्टायलिंग अपडेट्स आणि स्मार्ट टेक्नॉलॉजीचा समावेश आहे.

नवीन Jupiter 125 DT SXC मध्ये आइवरी ब्राउन नावाचा ड्युअल-टोन कलर पर्याय दिला गेला आहे, जो स्कूटरच्या इंटीरियर पॅनल्ससह फ्लॅट सीटशी देखील मॅच होतो. याशिवाय, 3D TVS लोगो, पांढऱ्या रंगाची ग्रॅब रेल यासारखे आकर्षक कॉस्मेटिक अपडेट्स या मॉडेलला दिले आहेत.

TVS Jupiter 125 DT SXC इंजिन आणि परफॉर्मन्सबाबत काय खास?

TVS Jupiter 125 DT SXC या वेरिएंटमध्ये पूर्वीप्रमाणेच 124.8cc चा सिंगल-सिलेंडर इंजिन देण्यात आला आहे. जो 6,500 rpm वर 8 bhp आणि असिस्ट फंक्शनसह 8.4 bhp पर्यंत पॉवर देतो. टॉर्क 10.5 Nm (बिना असिस्ट) ते 11.1 Nm (असिस्टसह) पर्यंत आहे. याला CVT गिअरबॉक्सची जोड मिळते, ज्यामुळे राइडिंग अधिक स्मूद होते.

TVS Jupiter 125 DT SXC मध्ये स्मार्ट फीचर्सचा अनुभव

TVS Jupiter 125 DT SXC मध्ये डिजिटल इंस्ट्रुमेंट क्लस्टर दिला असून, TVS च्या SmartXonnect फीचर्ससह हे मॉडेल येते. यात वॉयस कमांड, व्हेइकल ट्रॅकिंग, टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन, कॉल आणि एसएमएस अलर्टसारखे फिचर्स मिळतात. हे फीचर्स विशेषतः तरुण ग्राहकांसाठी आकर्षण ठरू शकतात.

राइड क्वालिटी आणि सेफ्टी

फ्रंटला टेलीस्कोपिक सस्पेन्शन आणि रिअरला थ्री-स्टेप अ‍ॅडजस्टेबल ट्विन-ट्यूब शॉक अब्झॉर्बर दिले आहेत. ब्रेकिंगसाठी फ्रंटमध्ये 220 mm डिस्क ब्रेक आणि रिअरमध्ये 130 mm ड्रम ब्रेकचा समावेश आहे. स्कूटरमध्ये 12 इंचाचे टायर आणि 163 mm ग्राउंड क्लीयरन्स आहे, जे भारतीय रस्त्यांसाठी योग्य आहे.

TVS चे हे नवे वेरिएंट Honda Activa 125 आणि Suzuki Access 125 यासारख्या प्रतिस्पर्ध्यांना जोरदार टक्कर देण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : Honda Activa 7G येतेय धमाकेदार फीचर्ससह, 66kmpl मायलेज आणि फक्त ₹3999 EMI मध्ये.

Share This Article